फुलंब्री बसस्थानकास आणखी एक नियंत्रक तातडीने द्यावा : सभापती अर्चना दुतोंडे

Foto
बसस्थानकाची दुरुस्तीही करावी

फुलंब्री, (प्रतिनिधी) : येथील बसस्थानकात एकच नियंत्रक असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहेत. यासाठी आणखी एक नियंत्रक स्थानकास द्यावा अशी मागणी नगरपंचायत बांधकाम सभापती अर्चना उमेश दुतोंडे यांनी विभागीय नियंत्रक यांना निवेदनाद्वारे केली आहे.

यास्थानकात जवळपास ५०० च्यावर बसेसची आवाक जावक आहे. यामुळे प्रवाशांची चढ उतार मोठ्या प्रमाणात होते महामंडळास फुलंब्री स्थानकातून रोज लाखो रुपयाचे उत्पन्न आहे तरी या स्थानकात प्रवाशासाठी कुठलीही सुविधा नाही, वाहतूक नियंत्रक एक असल्याने ते सकाळी ९ ९ ते ते संध्याकाळी ६ पर्यंत काम करतात. यात शैक्षणिक पासेसची संख्या दोन हजारावर आहेएकानियंत्रकानेकोणती व कितीकामे करावी. एकाचवेळी पास घेणारे विद्यार्थी, बस वेळ विचारणारे प्रवासी, आलेल्या बसेसची नोंद घेणे अशी सर्व कामे एका नियंत्रकास शक्य नाही. 

यासाठी आणखी एक नियंत्रक द्या तरच या स्थानकातील कामे सरळीत होतील. फुलंब्री बसस्थानक हे मोडकळीस आलेले आहे मोठे उत्पन्नाचे स्थानक असताना देखील येथे शौचालय बरोबर नाहीपिण्याचेपाणीनाही, बऱ्याचवर्षांपासून उपहारगृह (कँटीन) बंद आहे. यामुळे प्रवाशांना या सर्व सुविधासाठी स्थानकाच्या बाहेर जावे लागते तरी या स्थानकास आणखी एक नियंत्रक व स्थानक दुरुस्ती लवकर करावी असे निवेदन बांधकाम सभापती अर्चना उमेशदुतोंडे यांनी विभागीय नियंत्रक संभाजीनगर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार आंबादास दानवे यांना हे निवेदन दिलेआहे.